
कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मविसे पक्षाची मागणी
अन्यथा महाराष्ट्रात आंदोलन उभा करण्याचा राज्य सरकारला इशारा
प्रतिनिधी: मुंबई:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवारयांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले आहे. निवेदनामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकारचे नुकतेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशना मध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाइन रमी गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,या सभागृहांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यापेक्षा त्यांना रमी खेळण्यांमध्ये जास्त रस असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे त्यामुळे राज्याचे सर्वोच्च असलेल्या सभागृहामध्ये कृषिमंत्र्यांनी असे असंविधानिक वागणे चुकीचे आहे.असल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरती कृषिमंत्री प्रतिक्रिया देताना सांगतायत की मी कोणत्याही प्रकारचं पाप केलेलं नाही हा मुजोरपणा महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या मंत्र्याला शोभत नाही,झालेल्या चुकीची माफी मागून प्रकरण थांबवण्यापेक्षा हा मूजूरपणा त्यांनी केलेला आहे,त्यामुळे आपण तात्काळ कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा,अन्यथा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन उभे केले जाईल असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने राज्य सरकारला दिला आहे.