
भाट निमगाव,खोरोची,निरवांगी येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे शाखेचे उदघाटन
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याचे संकेत ?
प्रतिनिधी : इंदापूर
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाट निमगाव, निरवांगी,खोरोची या तीन गावातील शाखेचे अनावर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविराज माने, संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे,इंदापूर तालुका उपाध्यक्ष नागेश घोगरे,कार्याध्यक्ष राहुल गायकवाड,महिला सेना तालुका अध्यक्ष अनिता गायकवाड, सुनील गायकवाड, बेलवाडी अध्यक्ष नितीन भिसे,संतोष काळे,विठ्ठल जावीर,साधू जाधव,अवि गायकवाड, भाटनिमगाव शाखा अध्यक्ष, भिवाजी पवार, राजेश पवार, सुदर्शन पवार,राजू कांबळे,खोरोची शाखा अध्यक्ष सुनील गायकवाड, सागर साठे, शाहजी काळकुटे, निरवांगी शाखा अध्यक्ष अशोक शेटे, रणजीत काशिद,आप्पा जाधव, धनाजी शिंदे,अशोक शेटे,विकास शेटे इत्यादी उपस्थित होते.शाखा उदघाटन प्रसंगी बोलताना पक्षप्रमुख किरण साठे यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व त्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगीतले.तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यासाठी पदाधिकारी यांना सूचना दिल्या. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाराष्ट्र विकास सेना पक्ष लढविणार असल्याचे संकेत साठे यांनी दिले आहेत.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे,मविसे पक्ष निवडणूकीत उतरणार का? अशी चर्चा इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता करताना दिसत आहे.