वनपाल ते आर एफ ओ पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकपणे करा : मविसेचे वनमंत्री यांना निवेदन

वनपाल ते आर एफ ओ पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकपणे करा : मविसेचे वनमंत्री यांना निवेदन

अ.प्र.मु.व.प्र.दु.सं.यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

अन्यथा विधानभवनावर पाच जुलैला मोर्चा काढणार – किरण साठे

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचेवने मंत्री गणेश नाईक आणि मा.प्रधान सचिव वने महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी प्रत्येक्ष मंत्रालयात भेटून निवेदन दिले आहे.निवेदनात राज्यातील वनपाल ते आर एफ ओ पदोन्नती मध्ये पात्र असलेल्या सर्व वनपाल यांच्या सर्व्हिस बुक ची संपूर्ण चौकशी करून पदोन्नती पारदर्शकपणे पार पाडवी आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) नागपूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.महाराष्ट्र राज्यातील वनपाल ते आर एफ ओ पदोन्नती प्रक्रिया वने खात्यामार्फत सुरू करण्यात आली आहे,त्यामध्ये अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) नागपूर यांनी पात्र असलेल्या वनपाल यांच्यावर दोषारोप आहे का? सद्या कारवाईचा अंमल सुरू आहे का? याची शहानिशा करून व त्यांच्या सर्व्हिस बुक ची माहिती घेवून प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असताना स्वतःचा मनमानी कारभार केला आहे.या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होण्याची दाट शक्यता असून वनेमंत्री गणेश नाईक यांना अंधारात ठेवून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्र.दु.सं.नागपूर हे कारभार करीत आहेत असा आरोप पक्षप्रमुख किरण साठे यांनी केला आहे.तरी या पदोन्नती प्रक्रियेत सर्व वनपाल यांच्या सर्व्हिस बुक ची चौकशी करण्यात आल्याशिवाय पदोन्नती करण्यात येऊ नये आणि मनमानी कारभार करणाऱ्या अ.प्र.मु.व प्र.दु.सं.नागपूर यांच्यावर कारवाई न केल्यास गिरगाव चौपाटी येथून पाच जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मविसे पक्षाने निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom