
मराठा समाजाच्या मुंबई मधील आंदोलनाला मविसेचा पाठींबा – धनाजी पाटील
प्रतिनिधी: मुंबई: मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक श्री मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे २९ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली असून या आंदोलनाला महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे मत सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेले अनेक दिवस मनोज जरांगे पाटील हे उपोषण, आंदोलन,मोर्चे करीत असून त्यांनी या आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला असून मुंबईमधून त्या आरक्षणाची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा देण्यात येत असल्याची भूमिका महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील यांनी जाहीर केली आहे.