
नितेश राणे हकालपट्टी प्रकरण :
राज्यपाल कार्यालयाचे गृह विभागाचे अवर सचिव यांना कार्यवाहीचे आदेश
महाराष्ट्र विकास सेना पक्षाने दिला होता आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठेंनी निवेदन देवून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातून मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.त्या मागणीसाठी १८ मार्च रोजी राज्यपालांच्या निवास्थान असलेल्या राजभवनासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
मुंबई मध्ये आंदोलनासाठी गेल्यानंतर राज्यपालांच्या सचिवालयाडून राज्यपालांच्या अवर सचिव करुणा वावडणकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे अवर सचिव यांना पत्र पाठवून नितेश राणेंच्या विरोधात दिलेल्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या निवेदनावर कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले आहेत.राज्यामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये दुही माजवण्याचे काम मंत्री नितेश राणे करीत असल्याचे त्यांच्यावर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे केली होती,त्याची दखल घेवून राज्यपाल कार्यालयाच्या सचिवलायाकडून गृह विभागाचे अवर सचिव यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत असे किरण साठेंनी सांगितले.