
माळीनगर मधील व तुळशी ते मोडलिंब रस्त्याच्या चौकशीसाठी राजेश खरे यांचे मंत्रालयासमोर १० मार्च पासून बेमुदत ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी : मुंबई : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी मुंबई येथील मंत्रालयासमोर १० मार्च पासून बेमुदत ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे.
सदर आंदोलन सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक २ या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील माळीनगर मधील तीन रस्ते व माढा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तुळशी ते मोडलिंब या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम करण्या आली असल्याची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, बांधकाम विभागाचे अवर सचिव तसेच ग्रामविकास विभागाचे अवर सचिव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.संबंधित कामाचे पुरावे निवेदनाच्या बरोबर जोडले असल्याचे खरे यांनी सांगितले आहे.संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी याच मागणीसाठी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे खरे यांनी सांगितले.