वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन आणि कंक यांची बदली रद्द करा – मविसे

वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन आणि कंक यांची बदली रद्द करा – मविसे

अन्यथा २२ जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढणार – किरण साठे

प्रतिनिधी : नागपूर : महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांना मंत्रालयात जावून व नागपूर येथील महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांना भेटून निवेदन दिले आहे.निवेदनात वनक्षेत्रपाल या पदाची पुणे व कोकण या दोन झोनमध्ये झालेले आपसी बदली ही शासन निर्णयानुसार झाली नसल्याने झालेले बदलीचे आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी केली आहे.

८ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णय नुसार शासन आदेश मधील ब विनंती बदल्या मधील अनुक्रमांक (२८ )वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शिवाजी महाजन व (२९ ) वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष श्रीपती कंक यांची झालेली बदली ही पुणे प्रशासकीय विभाग मधून कोकण प्रशासकीय विभागामध्ये आपसी बदली झालेली आढळून येत आहे विनंती बदलीच्या गोंडस नावाखाली सदरची बदली झाली असून शासन निर्णयामध्ये नमूद विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये दोन प्रशासकीय विभागामध्ये आपसी विनंती बदली करण्याचे कोणतीही स्पष्ट अशी तरतूद आढळून येत नाही तसेच नुकतेच महाराष्ट्र वन सेवेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या विषयी धोरण महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक एम एफ एस २०१६/प्र. क्र.१४३/फ-८ दिनांक १५ मार्च २०१७ व त्यानंतर या संबंधित झालेला २०१८ मधील बदल्यांचा शासन निर्णय या धोरणांचा आणि यातील असलेल्या नियमांचा भंग झाल्याने वर नमूद केलेल्या अनुक्रमांक २८ व २९ या क्रमांकाचे बदल्याचे आदेश रद्द करण्यात यावेत अशी मागणी पक्षप्रमुख किरण साठे यांनी केली आहे.

तसेच बदलीचे आदेश रद्द न केल्यास कोणत्या शासन निर्णयानुसार हे आदेश रद्द करता येत नाहीत हे लेखी कळवण्यात यावे तसेच या बदलीच्या प्रक्रियेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.त्यामुळे या बदलीचे आदेश तात्काळ रद्द करण्यात यावेत अन्यथा आपल्या विरोधामध्ये २२जानेवारी २०२४ ला मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom