महाराष्ट्र विकास सेनेच्या तालुका सरचिटणीस पदी डॉ.विकास लोखंडे
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा राज्यव्यापी मेळावा अकलूज येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय या ठिकाणी पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यामध्ये तरंगफळ तालुका माळशिरस येथील डॉ. विकास लोखंडे यांची पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी जाहीर मेळाव्या मध्ये तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली. डॉ विकास लोखंडे हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडे असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व पक्षाचा विस्तार करण्यासाठी पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांच्याकडे माळशिरस तालुक्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. तरंगफळ व त्यांच्या पंचक्रोशीतील गावातील जनतेमधून डॉ.विकास लोखंडे यांच्या निवडीचे कौतुक केले जात आहे.पक्षप्रमुख किरण साठे यांचे विचार माळशिरस तालुक्यातील घराघरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार डॉक्टर विकास लोखंडे यांनी केला असल्याचे सांगितले,यावेळी महाराष्ट्र विकास सेनेचे नेता दत्ता कर्चे राज्य समन्वयक अजित साठे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्यामध्ये उपस्थित होते.
