शिंदेसह,महाराष्ट्र विकास सेना पक्षानेही सुरू केले उपोषण
उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणी
प्रतिनिधी : करकंब : उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी करकंब येथे सचिन शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्या उपोषणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने राज्य कार्यकारणी सदस्य राजेश खरे,पंढरपूर तालुका प्रमुख व माढा विधानसभा प्रमुख अर्जुन शेटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
करकंब आणि इतर २६ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून करकंब साठवण तलाव कोरडा पडला आहे त्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण आणि भटकंती होत असून सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी करकंब येथे सचिन शिंदे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने राजेश खरे आणि अर्जुन शेटे यांनीही उपोषणाला पाठिंबा देवून स्वतः त्यांनीही उपोषणाला सुरुवात केली आहे.करकंब परिसरातील धरणग्रस्त म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत,मात्र पाणी सोडले जात नाही,या उलट दहिगाव माढा सिंचन योजनेमध्ये पाणी सोडले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी आरोप केला आहे.माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे,त्यामुळे करकंब व परिसरातील गावांमधून त्यांच्यावर जनता नाराज झाली असल्याचे दिसून येत आहे. उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते सचिन शिंदे आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राजेश खरे आणि अर्जुन शेटे यांनी सांगितले आहे.
