विभाग नियंत्रक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर ५ सप्टेंबरला आंदोलन

विभाग नियंत्रक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर ५ सप्टेंबरला आंदोलन

माळशिरस येथे वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी

प्रतिनिधी – सोलापूर : विभाग नियंत्रक रा.प.सोलापूर यांना किरण साठे यांनी माळशिरस बस स्थानक येथे दोन वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करणेबाबत निवेदन सादर केले आहे,तसेच ५ सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असून तेथील लोकसंख्या किमान ३४ हजार इतकी आहे,तसेच माळशिरस शहरात नगरपंचायत असून न्यायालय,पंचायत समिती तहसील कार्यालय,तालुका कृषी कार्यालय,पाटबंधारे कार्यालय आहेत.तसेच तालुक्यातील इतर प्रमुख कार्यालये माळशिरस शहरांमध्ये अस्तित्वात आहेत.त्यामुळे प्रवाशांची येण्या जाण्यासाठी खूप मोठी वर्दळ अथवा गर्दी असते सद्या माळशिरस बस स्थानक येते सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत फक्त एकच वाहतूक नियंत्रक आहे.

संध्याकाळी ६ वाजलेनंतर असंख्य बसेस बस स्थानकाच्या बाहेरूनच जातात त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.प्रवाशांचे होणारे हाल त्वरित थांबविण्यासाठी माळशिरस बस स्थानक येथे सकाळी ६ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असे दोन वाहतूक नियंत्रक नेमण्यात यावेत अशी मागणी करून रा. प. सोलापूरचे विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom