माळेवाडी (अ) ग्रा.पं.मधून न.प.कडे वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम न करण्याच्या मागणीसाठी ६ जून ला आंदोलन
आंदोलनाची दखल न घेतल्यास १० जून रोजी सह आयुक्त मेहता मॅडम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
प्रतिनिधी : अकलूज : अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवून बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी माळेवाडी अकलूज ग्रामपंचायतमधून नगरपरिषदेकडे वर्ग झालेले कर्मचारी यांना कायम करण्यात येवू नये या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
अकलूज नगरपरिषद अस्तिवात येण्या अगोदर माळेवाडी अकलूज ग्रामपंचायत मध्ये काही ठराविकच कर्मचारी कामाला होते मात्र अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर होणार आहे,म्हणून कामाला नसलेल्या कर्मचारी यांना तत्कालीन माळेवाडी ग्रामपंचायतने कर्मचारी दाखवून त्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला असून तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त ज्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले आहे त्यांची चौकशी करण्यात यावी आणि ज्यांना नियमात बसत नसताना कामावर घेतले आहे,त्यांना कामावर घेणाऱ्या तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांचीही चौकशी करण्यात यावी आणि मगच त्यांना कायम करण्यासाठी प्रयत्न करावेत चौकशी झाल्याशिवाय त्यांना कायम करण्यासाठी पाठपुरावा करू नये या मागणीसाठी ६/६/२०२३ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देवून नगरपरिषदेने दिलेल्या प्रस्तावातून माळेवाडी अकलूज ग्रामपंचायत मधून आलेल्या सर्व कामगारांची यादी सह आयुक्त सौ मेहता मॅडम यांच्याकडून माघे घेण्यात यावी अन्यथा १०/५/२०२३ रोजी सह आयुक्त मेहता मॅडम यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
