अकलूज नगरपरिषदेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे हलगीनाद आंदोलन

अकलूज नगरपरिषदेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे हलगीनाद आंदोलन

अकलूजच्या काझी गल्ली परिसरातील शौचालय इतरत्र हलविण्याची मागणी

अकलुज (मोहसिनशेख) : शहरातील काझी गल्ली परिसरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे काम तात्काळ थांबवून इतरत्र ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांकडून शौचालयास विरोध असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांनी अकलूज नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक शौचालय विषयी चांगलेच धारेवर धरले आहे.

अकलूज नगरपरिषदेच्या माध्यमातून काझी गल्ली येथे सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काम सुरु करण्यापूर्वी सदरच्या कामाला त्या ठिकाणच्या जनतेमधून विरोध असल्याचे शेकडो नागरिकांच्या सह्याचे निवेदन नगरपरिषद प्रशासनास देण्यात आले आहे. या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात येऊ नये अशी स्थानिकांची मागणी असल्याने नगरपरिषदेने ते काम इतरत्र हलवून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधावे याबाबत अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देण्यात आले होते. दि.१० फेब्रुवारीपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करुन शौचालय बांधण्यात यावे अन्यथा हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला होता.
त्या अनुषंगाने नगरपरिषदेकडून तात्काळ कार्यवाही न झाल्याने अकलूज नगरपरिषदेसमोर तीव्र स्वरूपात हलगीनाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक ता.उपाध्यक्ष जाकिर शेख,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,लक्षवेधी सेनेचे अनिल साठे, काँग्रेसचे रघुनाथ साठे,फारुक शेख,समिर काझी,गौस कुरेशी,आसिफ सय्यद,शाहरुख काझी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom