नातेपुते येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
विनोद लांडगे मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी : नातेपुते : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे विनोद लांडगे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला ए पी आय प्रवीण सपांगे,बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,पी एस आय तानाजी पवार,रामोशी समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिरामध्ये १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून शिबीर पार पाडण्यासाठी राहुल कुचेकर,शुभम लांडगे,अमित लांडगे,गोट्या खुडे,सोन्या लांडगे,अक्षय मदने,अजित भिसे ,अक्षय रुपणवर,अमोल लाळगे,ओंकार भिसे,चैतन्य लांडगे यांनी परिश्रम घेतले.
विनोद लांडगे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून सद्या ते कोणत्याच पक्षाचे पदाधिकारी नाहीत मात्र त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम आहे.त्यामुळे त्यांनी गेली सहा वर्षे झाली बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचा कार्यक्रम अविरतपणे चालू ठेवला आहे.

