वेळापूरचे सरपंच बनसोडे आणि आर.पी.आय चे सरतापे यांचा सत्कार
प्रतिनिधी : वेळापूर : वेळापूर गावचे नूतन लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे माळशिरस तालुका अध्यक्ष रजनीश बनसोडे यांचा आणि आर पी आय पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांचा वाढदिवसानिमित्त वेळापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय साठे,माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब धाइंजे,मोहनानंद(महाराज)ओव्हाळ,माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश साठे,भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चे चे अजित साठे,महेंद्र साठे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा शहराध्यक्ष उदय कांबळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

