पत्रकार हा वस्तुस्थिती मांडून जनतेला न्याय देणारा घटक –किरण साठे
पत्रकार दिनानिमित्त अकलूजमध्ये सत्कार संपन्न
प्रतिनिधी : : पत्रकार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बहुजन ब्रिगेड संघटना यांच्या वतीने अकलूजमधील विश्राम गृह येथे सत्काराचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक शहराध्यक्ष जाकीर शेख,बहुजन युवा ब्रिगेडचे शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी आयोजित केला होता.यावेळी दिव्य मराठीचे भारत मगर,दैनिक लोकमतचे राजीव लोहकरे,दैनिक पुण्यनगरी चे श्रीमंत बनकर,संचार चे लक्ष्मीकांत कुरुडकर,टाईम्स९ चे संपादक नौशाद मुलाणी,हुसेन मुलाणी,दिव्य मूर्ती चे संपादक सतीश अडगळे,साप्ताहिक माळशिरस पॅटर्न चे संपादक सचिन रणदिवे,थोरात,मुसा आतार यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आला.
किरण साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या कामाचे कौतुक करून पत्रकार हा समाजातील वस्तुस्थिती आणि उदभवलेले प्रश्न यावर पेपरच्या माध्यमातून मांडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत असतात आणि सामान्य कार्यकर्त्याला नेता बनविण्याची ताकद ही पत्रकारांमध्ये असल्याचे मत साठेंनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर,पिसेवाडी ग्रामपंचायत चे नूतन सदस्य साहिल आतार,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक चे सचिव जुबेर बागवान,उपाध्यक्ष इरफान बागवान,पिंटू एकतपुरे,बजरंग वाघमारे,यांच्यासह असंख्य जण उपस्थित होते.
