समाजकल्याण आयुक्त यांचे वसतिगृहाच्या जागेसंदर्भात आयुक्तालयात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

समाजकल्याण आयुक्त यांचे वसतिगृहाच्या जागेसंदर्भात आयुक्तालयात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन

प्रतिनिधी : पुणे : अकलूजमध्ये असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह बांधण्यासाठी खाजगी जागा विकत घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ संतोष नारनवरे यांना निवेदन देवून केली होती आणि ९ डिसेंबरला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

तात्काळ समाजकल्याण आयुक्त डॉ संतोष नारनवरे यांनी सहायक आयुक्त सोलापूर,प्रादेशिक उपायुक्त पुणे विभाग पुणे याच्याकडून माहीती घेवून शिक्षण विभागाचे सह आयुक्त यांना आणि क्षेत्रीय कार्यलयाना अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी खाजगी जागा विकत घेण्यासंदर्भात असलेला प्रस्ताव आयुक्तालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर तो प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवून मंजूर करून घेण्याचे आश्वासन समाजकल्याण आयुक्त डॉ संतोष नारनवरे यांनी किरण साठे यांना दिले आहे.त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom