माळशिरस तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याची सध्याची परिस्थिती पाहता “बडा घर पोकळ वासा” अशी आहे…! अविनाश सोनवणे
कुत्र्याला तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अकलूज या ठिकाणी घेऊन गेलो असता तेथील परिस्थिती पाहता असं लक्षात आलं की, या ठिकाणी सर्व कारभार अलबेल चालतो. या ठिकाणी ना वेळेत डॉक्टर हजर असतात, ना स्टाफ शिक्षित आहे. दवाखान्याच्या सर्वत्र परिसरात अस्वच्छता दिसुन आली. दवाखान्यात स्वच्छता ठेवली जात नाही.फि ची पावती दिली जात नाही. पताळे डॉक्टरांशी संपर्क साधला असता काही प्रश्नांची सरबत्ती केली तर, ते चिडून बोलले कि सगळी माहिती हि माहिती अधिकारातूच घे इतके बेशिस्त अधिकारी…
कुत्रा, मांजर यांच व्हॅक्सिनेशन सरकारी उपचारातुन होतं नाहीत. पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रा, मांजर यांच्यावरील आरोग्याच्या औषध- गोळ्या मोफत भेटत नाहीत. तर ते सगळे उपचार खाजगी दवाखान्यात करावे लागतात. त्यासाठी भरपूर रक्कम मोजवी लागते.असल्याची संतप्त भावना सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे यांनी व्यक्त केली.
अकलूज मधील खाजगी डॉग स्पेशालिस्ट हे चार- पाच दिवसांच्या ट्रीटमेंटसाठी तीन – चार हजार रुपये घेतात. गोरगरीब- सर्वसामान्यांना खाजगीत उपचार घेणे परवडत नाहीत.अकलूजमधील कुत्र्याच्या खाजगी डॉक्टरांनी अमाप संपत्ती कमावली आहे. दहा- बारा वर्षात भाडोत्री ते हॉस्पिटालाय्स एरिया मध्ये जागा घेऊन मोठे हॉस्पिटल बांधले आहेत. आज खाजगी डॉक्टरांनी करोडो रुपयांची प्रॉपर्टी या माध्यमातून उभा केली आहे. आशा पद्धतीने खाजगी डॉक्टरांचे फोफावते आहे.
माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार श्री. राम सातपुते यांनी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रा, मांजर यावरी स्पेशलिस्ट डॉक्टर नेमावेत, शिवाय कुत्रा, मांजर यांचे व्हॅक्सिनेशन सरकारी दवाखान्यातून मोफत मिळावेत. आणि संबंधित आजाराच्या औषध-गोळ्या, उपचार पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत दिला जावा. अशी मागणी अधिवेशनात सरकारकडे करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे यांनी केली आहे.

