समाजकल्याण आयुक्तांकडे अकलूज नगरपरिषदेचा जागेसंदर्भातील अहवाल सादर

समाजकल्याण आयुक्तांकडे अकलूज नगरपरिषदेचा
जागेसंदर्भातील अहवाल सादर

किरण साठेंचा पाठपुरावा योग्य दिशेने

प्रतिनिधी : अकलूज :

अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री कैलास आडे यांनी दिनांक १५ मार्च २०२२ रोजी अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वसतिगृहाच्या जागेसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराचा अहवाल तात्काळ पाठवण्यात यावा या मागणीसाठी निबंदन देवून २३ डिसेंबरला मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक अध्यक्ष जाकीर शेख,बहुजन ब्रिगेडचे शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे उपस्थित होते.

अकलूज नगरपरिषदेला दिनांक 15 मार्च 2022 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्री कैलास आडे यांनी पत्रव्यवहार करून शासकीय वस्तीगृहा करिता शासकीय जमीन उपलब्ध करून मिळणे बाबत पत्रव्यवहार केलेला असून आपण त्यावर ती कोणत्या प्रकारची कार्यवाही केली याची तात्काळ माहिती देऊन जागा उपलब्ध असल्यास तशी एनओसी द्यावी आणि जागा उपलब्ध नसल्यास जागा उपलब्ध नाही अशी एनओसी तात्काळ देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन ब्रिगेड संघटनेच्या मागणीनुसार अकलूज नागरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आडे यांना तात्काळ अहवाल पाठविला आहे,त्यामुळे १५ मार्च २०२२ पासून प्रलंबित असलेला पत्रव्यवहार किरण साठे यांच्या मोर्चाच्या धसक्याने पूर्ण झाला आहे.तसे लेखी पत्र अकलूज नगरपरिषदेकडून किरण साठे यांना देण्यात आले आहे.

चौकट

१५ मार्च २०२२ ला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कार्यलयाकडून अकलूज नगरपरिषदेला अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता,त्यावर अकलूज नगरपरिषदेने दिनांक १९/१२/२०२२ पर्यंत कोणत्याही प्रकारचा अहवाल समाजकल्याण कार्यालय सोलापूर याना केला नव्हता याची जाणीव मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना करून देताच आणि २३ तारखेला मोर्चाचा इशारा देताच त्यांनी तात्काळ अहवाल सादर केला आहे,मात्र इतक्या दिवस हा विषय कुणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला हा विचार करण्यासारखा विषय आहे.

किरण साठे
सरचिटणीस – राष्ट्रवादी काँग्रेस
अध्यक्ष – बहुजन ब्रिगेड संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom