सह आयुक्त लोकरे व मुख्याधिकारी गाढवे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
त्रयस्थ अधिकारी यांची समिती नेमण्याचे आश्वासन
प्रतिनिधी : पुणे : पुणे विभागाचे आयुक्त डॉ सौरभ राव आणि नगरपरिषद विभागाचे
उप आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्या कार्यालयासमोर आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेले सह आयुक्त लोकरे व माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी गाढवे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या कारभाराची विभागीय स्तरावरून चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत च्या माध्यमातून दिनांक १० /९/२२ पासूनसुरू झालेल्या घनकचरा विभागामार्फत केल्या जात असलेल्या कामावर इस्टीमेंटमध्ये नमूद असलेल्या कामगारांची संख्या एवढे कामगार उपस्थित नसल्याची शक्यता असून इस्टीमेंट मध्ये नमूद असलेल्या सफाई कामगार,गटारी काढणारे कामगार,कचरा गोळा करणारे ड्रायव्हर,हेल्पर या कामगारांचे माळशिरस परिसरात गेलेले सीसीटीव्ही फुटेज तपासावे म्हणजे सर्व प्रकरण उजेडात येईल.तसेच माळशिरस नगरपंचायतच्या हद्दीत असलेल्या डम्पिंग ग्राउंड ची माहिती देण्यात यावी.
सद्या ज्यांना ठेका देण्यात आला आहे,ते ठेकेदार हे कार्यरत असलेल्या सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत आहेत का ? तसेच त्यांचा पीएफ भरलेल्या चलन पावत्या,सेफ्टी किट देण्यात येत आहे का ? याचीही चौकशी करण्यात यावी आणि मगच बिल काढण्यात यावे जोपर्यंत माझ्या तक्रारीनुसार चौकशी केली जात नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल काढण्यात येवू नये अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक १७/१०/२२ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र माझ्या निवेदनावर गेली एक महिना होऊन गेला आणि तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही आणि संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले आहे,त्यामुळे सर्रास सह आयुक्त लोकरे आणि माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांचे आर्थिक संबंध आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी न करता बिल अदा केलेल्या माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्यावर व एक महिना होऊनही माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही न करणाऱ्या सह आयुक्त यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर २५/११/२२ रोजी स्वरूपात आंदोलन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आल्याची माहिती आम्हाला ज्ञात झाली नाही किंवा मिळाली नाही,उलट त्यांनी माझी तक्रार असताना संबंधित ठेकेदारचे बिल अदा केले आहे हे त्यांनीच मान्य केले आहे.माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी गाढवे व सह आयुक्त लोकरे यांच्या विरोधात तक्रार असताना माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी हे कसे मला पत्रव्यवहार करू शकतात हा प्रश्न उपस्थित होतो आहे ? ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न करणारच म्हणून त्यांनी मला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने मला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे व माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने मला बोलवून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवली नाहीत उलट त्यांच्याकडे मी माहितीचा अधिकार टाकून एस्टीमेंट मागितले तरी त्यांनी दिले नाही आणि त्या प्रकरणात मी अपिलामध्ये गेलो आहे,त्यांनी मला बोलवून कोणत्याही प्रकारची संबंधित पत्रात नमूद मुद्यांची माहिती दिली नाही,त्यामुळे माळशिरस नगरपंचायतच्या माझ्या तक्रारीनुसार किमान वेतन/epf/esic/विमा/ gps गाड्यांची व एस्टीमेंट मध्ये एकूण मंजूर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या याची मला लेखी माहिती देवून संबंधित प्रकरणाची आपल्या विभागीय स्तरावरून चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी आणि सह आयुक लोकरे यांच्यावर आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप झालेले आहेत त्यामुळे लोकरे यांना व मुख्याधिकारी गाढवे यांना संबंधित ठेकेदाराकडून लाखो रुपये हप्ते दिले जात असल्याचे माळशिरस नगरपंचायतच्या आवारात चर्चा चालू आहे त्यामुळे संबंधित ठेक्याच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करून आर्थिक लूट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मला दिलेले पत्र पुरावा म्हणून आपण त्याची चौकशी करून लोकरे व गाढवे यांच्यावर चौकशीअंती फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी ५/१२/२२ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेने दिला आहे.संपूर्ण प्रकरणासाठी त्रयस्थ अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.तरीही प्रत्येक्षात चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
