सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयासमोर २७ नोव्हेंबरला आंदोलन
माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक काझी व डॉ सर्जे यांच्या हॉस्पिटलवर कारवाई करा – बहुजन ब्रिगेड
प्रतिनिधी : सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ प्रदीप ढेले यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित निवेदन देवून दहिगाव शाखा अध्यक्ष सचिन खिलारे,उपाध्यक्ष बापूराव बुधावले,नाना खिलारे,माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ काझी व डॉ सर्जे यांच्या हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माळशिरस येथील शुभम हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ दत्तात्रय सर्जे यांच्या हॉस्पिटलमध्ये अनिल खिलारे यांच्यावर चुकीचे उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केल्याने आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी यांची आपल्या नियमाप्रमाणे नेमणूक आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी आपण माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ काझी यांची नेमणूक करून एक महिना होवून सुद्धा त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचा अहवाल आपल्याकडे पाठवला नाही त्यामुळेच येत्या सोमवारी पर्यंत त्यांनी चौकशी करून अहवाल आपल्याकडे पाठवला नाही तर त्यांच्यावर तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी २९/११/२२ रोजी सिव्हील सर्जन यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाखा अध्यक्ष सचिन खिलारे,उपाध्यक्ष बापूराव बुधावले,नाना खिलारे यांनी दिला आहे.
