पंढरपूर मंदिर समितीकडू होणारी भाविकांची लूट तात्काळ थांबवण्याची मागणी
बहुजन ब्रिगेड संघटना व लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर चे कार्यकारी अधिकारी यांना बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने शहराध्यक्ष अमोल घोडके व लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष सागर बडवे,यांनी निवेदन देवून मोबाईल बंदी उठवणे,चेंजिंग रूम व एक रुपया पिण्याचे पाणी मशीन चालू करण्याची मागणी केली आहे.या वेळी,बहुजन ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष अमोल घोडके,लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष सागर बडवे, अजित कांबळे, गणेश देवमारे, विकास जाधव उपस्थित होते.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने भाविकांसाठी चेंजिंग रूम उभा केल्या होत्या त्याची दुरावस्था झालेली आहे, एक रुपये पाणी पिण्याचे मशीन प्रदक्षिणामार्ग येथे बसवण्यात आलेले तेही बंद पडलेले आहे, ते चालू करण्यात यावे.मंदिर समितीचे 7 मजली इमारतीत जे मोबाईल लॉकर चालू केलेले आहेत, प्रत्येक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तपासून मोबाईल लॉकरमध्ये जमा करावे लागत आहेत मात्र प्रत्येक मोबाईलची फी मंदिर समिती पाच रुपये आकारत असून अनेक भाविकांकडे एक किंवा दोन मोबाईल असतात व श्री विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविक आपल्या परिवारासह येत असतात, व त्यांच्याकडे अनेक मोबाईल असतात, या भाविकांची रोजच्या रोज मोबाईल लॉकर माध्यमातून मोठी लूट होत असून संबंधित लूट तात्काळ थांबवण्यात यावी,असे निवेदनात नमूद केले आहे आणि तात्काळ लूट न थांबविल्यास आणि इतर मागण्यांचा विचार न केल्यास तुकाराम भवन कार्यालय समोर तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके व सागर बडवे यांनी दिला आहे.
