अश्विनी हॉस्पिटलमध्ये म.फुले जनआरोग्य योजना चालू करण्यासाठी किरण साठे यांचे पालकमंत्री यांना निवेदन

अश्विनी हॉस्पिटलमध्ये म.फुले जनआरोग्य योजना चालू करण्यासाठी किरण साठे यांचे पालकमंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी—सोलापूर—कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मौजे संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरस येथे असलेल्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना त्वरित चालू करण्याची मागणी करण्याबाबत निवेदन देण्यात दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर,वसंत माने,जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट, नगरसेवक मारुती देशमुख,माजी उपसरपंच तुकाराम ठवरे,के पी काळे,रमेश पाटील,सुदाम आवारे,सागर कोळी इत्यादी उपस्थित होते.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, सर्वसामान्य माणसाला बायपास सर्जरी करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च हा परवडणारा नसून त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून हा उपचार मोफत करण्याची सोय केलेली असताना अकलूज ता माळशिरस येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना अस्तित्वात असलेले अनेक हॉस्पिटल आहेत,मात्र त्या हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी केली जात नाही,त्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला सोलापूर येथे जावे लागत असल्या कारणाने त्याची सोय ही माळशिरस तालुक्यातच व्हावी यासाठी आपण आपल्या स्तरावरून मौजे संग्रामनगर अकलूज येथे असलेल्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू होती मात्र काही कारणास्तव ती बंद करण्यात आली आहे,ती योजना बंद झाल्याने अनेक सर्वसामान्य माणसाचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे या अश्विनी हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्याची उत्तम सुविधा उपलब्ध असल्याने या हॉस्पिटलमध्ये महात्मा जन आरोग्य योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom