राजेश खरे यांना बहुजन ब्रिगेड संघटनेकडून कार गाडी भेट
संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी : करकंब : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या हस्ते करकंब तालुका पंढरपूर येथील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांना आय टेन ही कार गाडी भेट देण्यात आली.यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे,मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पालवे,दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे,सरकारी ठेकेदार महादेव नरुटे,दादासाहेब पालवे सचिन पिसे,सैलानी सय्यद,विकास केसकर इत्यादी उपस्थित होते.
राजेश खरे हे बहुजन ब्रिगेड संघटनेमध्ये स्थापनेपासून कार्यरत असून त्यांच्या कामाची दखल घेवून तसेच त्यांच्या कामाचे वाढलेले प्रमाण रात्री अपरात्री त्यांना संघटनेच्या कामासाठी व जनतेच्या प्रश्नासाठी धावपळ करावी लागत असल्याने त्यांना संघटनेच्या वतीने गाडी भेट देण्यात आली आहे.
