अकलूजमध्ये आण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त चित्रकला व निंबध स्पर्धा

अकलूजमध्ये आण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त चित्रकला व निंबध स्पर्धा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बहुजन ब्रिगेडने केले होते आयोजन

प्रतिनिधी : : साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा नंबर दोन व मुलींची शाळा नंबर तीन अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी चित्रकला स्पर्धा व निंबध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.सदर चित्रकला स्पर्धेत छोट्या गटात ३री व ४ थी चा समावेश होता मोठ्या गटात ५,६,७ वी चा समावेश करण्यात आला होता.तर निंबध स्पर्धेत ५,६,७ चा खुला गट करण्यात आला होता.

सदर स्पर्धेत चित्रकला विभागात छोटा गटामध्ये प्रथम क्रमांक खुशी सागर पवार,दुसरा क्रमांक भूमिका शिवाजी खंडागळे,तिसरा क्रमांक श्रावणी सुरेश साठे, मोठ्या गटात प्रथम क्रमांक आकांक्षा राहुल वायदंडे,दुसरा क्रमांक विशाखा राजेश भिसे,तिसरा क्रमांक अनुष्का समीर खंडागळे,तर निंबध स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री दिलीप पवार,दुसरा क्रमांक अंजली विलास खंडागळे,तिसरा क्रमांक श्रेया गेजगे यांनी मानांकन पटकावले.स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटच्या स्वरूपात खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक शहराध्यक्ष जाकीर शेख,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,मनसेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवक शहराध्यक्ष उदय कांबळे,राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे इरफान बागवान,किरण खंडागळे,आकाश धाइंजे,यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom