राष्ट्रवादी काँग्रेसचे फतेसिंह माने पाटील आणि पांडुरंग देशमुख सक्रिय झाल्याने चर्चेने धरला जोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे फतेसिंह माने पाटील आणि पांडुरंग देशमुख सक्रिय झाल्याने चर्चेने धरला जोर

अकलूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

प्रतिनिधी : अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य पांडुरंग देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पांडुरंग घुले यांच्या निवासस्थानी अकलूज मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांची अकलूज नगरपरिषदेच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवरती बैठक संपन्न झाली.यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अशोक गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,अभिमन्यू माने पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,अल्पसंख्याक विभागाचे अकलूज शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान,सामाजिक न्याय विभागाचे बाळा गायकवाड,राहुल ढेरे,समद बागवान,सरफराज बागवान उपस्थित होते.

अकलूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सतत व सक्रियपणे चालू असून अकलुज मधील वेगवेगळ्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आग्रही भूमिका घेत असल्याचे नेहमीच दिसून येत असून त्याच पार्श्वभूमीवर ती येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य पांडुरंग देशमुख यांच्या निवासस्थानी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फतेसिंह माने पाटील व पांडुरंग देशमुख यांच्यामध्ये खलबतं झाल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून फतेसिंह माने पाटील आणि पांडुरंग देशमुख सक्रिय झाल्याने अकलुज मधील जनतेमध्ये चर्चेने जोर धरला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom