
येत्या २४ तारखेच्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बहुजन ब्रिगेडचा पाठिंबा
प्रतिनिधी–आज२४–तास–अकलूज—
येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडी तर्फे जो अकलूजमध्ये बंद पाळला जाणार आहे त्याला संपूर्ण पाठिंबा असल्याचे बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ यांनी आज २४ तास शी बोलताना सांगितले,,ह्या बंदच्या पार्श्वभूमीवर अकलूज व परिसरातील सर्व नागरीक, व्यापारी वर्ग व किरकोळ दुकानदार यांना विनंती करण्यात येत आहे की, देशाची आर्थिक दिवाळखोरी, घसरलेला GDP, GST मुळे ग्राहकात निर्माण झालेली खरेदीची अमानसिकता या देशहिताच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधुन त्यावर चर्चा घडवुन आणणेसाठी तसेच CAA, NRC, NPR या देशविघातक कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी व इतर ५७ सामाजिक संघटनांच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अकलूज व परिसरातील नागरीकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे.असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी केले आहे,त्याला प्रतिसाद म्हणून बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ यांनीही या बंद मध्ये सहभागी होऊन
हा बंद पूर्णपणे शांततामय पद्धतीने होईल.अशी माहिती दिली आहे,