महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अकलूजकरांनी २४ तारखेला बंद पाळण्याचे वंचित बहुजन आघाडीकडून आवाहन

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अकलूजकरांनी २४ तारखेला बंद पाळण्याचे वंचित बहुजन आघाडीकडून आवाहन

प्रतिनिधी–आज२४–तास–अकलूज—
येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडी तर्फे वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन कळविले आहे,ह्या बंदच्या पार्श्वभूमीवर अकलूज व परिसरातील सर्व नागरीक, व्यापारी वर्ग व किरकोळ दुकानदार यांना विनंती करण्यात येत आहे की, देशाची आर्थिक दिवाळखोरी, घसरलेला GDP, GST मुळे ग्राहकात निर्माण झालेली खरेदीची अमानसिकता या देशहिताच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधुन त्यावर चर्चा घडवुन आणणेसाठी तसेच CAA, NRC, NPR या देशविघातक कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी व इतर ५७ सामाजिक संघटनांच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अकलूज व परिसरातील नागरीकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे.असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी केले आहे,त्याचप्रमाणे
हा बंद पूर्णपणे शांततामय पद्धतीने होईल.अशी माहिती वंचित बहूजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom