आंदोलनस्थळी गॅस टाकी ठेऊन पंढरपूरमध्ये महागाईच्या विरोधात बहुजन ब्रिगेड संघटना झाली आक्रमक

आंदोलनस्थळी गॅस टाकी ठेऊन पंढरपूरमध्ये महागाईच्या विरोधात बहुजन ब्रिगेड संघटना झाली आक्रमक

केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणाने तहसीलचा परिसर गेला दणाणून

प्रतिनिधी : पंढरपूर : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या उपस्थितीत बहुजन ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर वाढत्या महागाईच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.यावेळी बहुजन ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे, जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे, पंढरपूर तालुका अध्यक्ष समाधान कांबळे, माया खरे अखिल भारतीय रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी, मुकुंद घाडगे दलित स्वयंसेवक संघ पंढरपूर तालुका अध्यक्ष तात्या विष्णू झेंडे, हनुमंत आढाव, बाळाबाई दत्ता ढावरे, जनाबाई पांडुरंग कावरे, दिलीप मारुती शिंदे, अविनाश भोसले, कानिफनाथ शिंदे, निलेश सुळ,अतिष शिंदे उमेश शिंदे अक्षय सावंत, दत्ता साठे,धनाजी साठे , नितीन कांबळे ,रायबा कांबळे इत्यादी उपस्थित होते.आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी स्वीकारले.

पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस,खाद्यतेल,शेतीविषयक खताचे दर गगनाला भिडले असून महागाई मुळे सर्वसामान्य जनतेचे बेहाल झाले असून गोरगरिबांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे,अनेकांचे जगणे मुश्कील झाले असल्याने महागाई तात्काळ कमी करण्यात यावी अशी मागणी करून केंद्र सरकारच्या विरोधात व महागाईच्या विरोधात करण्यात आलेल्या घोषणेच्या आवाजाने पंढरपूर तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom