बहुजन ब्रिगेडचे महागाई विरोधात माळशिरस तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी : माळशिरस : केंद्र सरकारच्या निषेधार्थ व महागाईच्या विरोधात बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या नेतृत्वाखाली व माळशिरस तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष किरण साठे,प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे,ऋषी बनसोडे, धनाजी पाटील, शंकर वाघमारे,अभिजित केंगार,रुक्मिणी रणदिवे,प्रताप पाटील,बंडू कांबळे,आनंद मिसाळ,चांगदेव जाधव,महेंद्र रणदिवे,आदित्य काकडे,सचिन साळुंखे,अविनाश लोखंडे,सुमित लोखंडे,विनायक रणदिवे,रफिक मुलाणी,अशोक जाधव,आबासाहेब भिसे,सौरभ जाधव,अक्षय बल्लाळ,गणेश बनसोडे इत्यादी उपस्थित होते. सदर निवेदन अव्वल कारकून अजित जाधव यांनी स्वीकारले.
महागाईच्या मुद्यावर देशात भाजपने सत्ता हस्तगत केली,मात्र जनतेला अच्छे दिन आणण्यासाठी सत्ता द्या म्हणून जनतेला मते मागितली आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांना स्वतःच्या घोषणेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे,देशात महागाईने हैदोस घातलेला असताना केंद्रातील भाजप सरकार कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करताना दिसत नाही, तसेच महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पाऊल उचलताना दिसत नाही,वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे,जनतेला एक वेळचे जेवण मिळणे मुश्कील झाले असून या महागाईवरती नियंत्रण आणून सर्वसामान्य जनतेला परवडेल अशी महागाई कमी करावी आणि वाढत्या महागाईच्या बाबतीत जनतेमध्ये असलेल्या रोष्याबद्दल बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
