अँड.गुणरत्न सदावर्ते यांची नार्को टेस्ट करा – किरण साठे
प्रतिनिधी : : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी अँड.गुणरत्न सदावर्ते यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
मुंबई येथील आझाद मैदानात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू असताना अँड.गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन कर्त्यांना भडकावून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या निवास्थानावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले,आणि त्यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी सर्व एसटी आंदोलन कर्ते कामगार यांनी जाऊन चप्पल,दगड,फेकून हल्ला केला, त्या सर्व प्रकरणाचा सूत्रधार अँड.गुणरत्न सदावर्ते आहेत,असे म्हणून सदर घटनेचा किरण साठेंनी निषेध व्यक्त केला आहे.
सदर प्रकरणाचा सखोल तपास करून अँड.गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीमागील अदृश्य शक्ती शोधून काढण्यासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाला सदावर्ते यांनी कुणाच्या सांगण्यावरून विरोध करून याचिका दाखल केली होती,याचा मुख्य सुत्रधार संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्यासाठी अँड.गुणरत्न सदावर्ते यांची नार्को टेस्ट करण्यात यावी असे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात किरण साठे यांनी नमूद केले आहे.