करकंब ते मोडनिंब रस्त्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे १७ मार्च रोजी आंदोलन
प्रतिनिधी : करकंब : बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलापूर जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी करकंब ते मोडनिंब रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच संबंधित कामा मध्ये दोषी आढळणाऱ्या भोसे येथील सद्गुरु कन्स्ट्रक्शन व सदर प्रकरणात ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या जबाबदार असलेल्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तात्काळ कारवाई न केल्यास अधिक्षक अभियता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या कार्यालयासमोर १७ मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिला आहे. यावेळी उपस्थित शिवाजी शिंदे,महेश पाटिल,महेंद्र शिंदे,पप्पु गायकवाड उपस्थित होते.
