अकलुज नगर परिषद मधील आनंद जाधव यांच्याविरोधात मैत्री प्रतिष्ठान ची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार….

अकलुज नगर परिषद मधील आनंद जाधव यांच्याविरोधात मैत्री प्रतिष्ठान ची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार….

महेश शिंदे अकलूज नगर परिषदे च्या भ्रष्ट कर्मचाऱ्याच्या विरोधात आक्रमक.

अकलूज नगर परिषदेमध्ये आनंद जाधव यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर उपजिल्हा अधिकारी मा.शमा पवार मॅडम यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे.अकलूज नगरपरिषद हद्दीत असलेल्या भ्रष्ट कामाबाबत वारंवार मेल द्वारे तक्रार जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय यांना तक्रार केली आहे.अकलूज ग्रामपंचायत असताना आनंद जाधव तिथे अभियंता म्हणून कार्यरत होते त्यावर नगरपरिषद झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही नगरविकास विभागाकडे आनंद जाधव या अधिकाऱ्याच्या नावे कोणतीही नोकरी ची ऑर्डर नसताना सदरचे महाशय हे त्या ठिकाणी लाभाची काम करत आहेत.त्यामुळे शासनाच्या निधीचा व विकासाचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मैत्री प्रतिष्ठान यांनी धाव घेत सदरच्या प्रकरणात लक्ष घालून या व्यक्तीची सखोल चौकशी करावी व त्यास तिथून कार्यमुक्त करण्याची कारवाई व्हावी तसेच अकलूज परिषदेत कार्यरत असणारे कार्यालयीन अधीक्षक श्री.सुनील काशीद यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत सेवा नगरविकास विभागाकडे वर्ग झालेली आहे की नाही यावर लेखी कळावे व झाली नसेल तर संबंधित सदरच्या दोन्ही इसम शासकीय नोकरीत लायक नसल्याचे दिसून येत आहे.म्हणून त्यांची नावे कमी करून सेवा समाप्ती चे आदेश द्यावेत.असे निवेदन मैत्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom