मा.खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार फंडातून करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २६ जानेवारीला बेमुदत ठिय्या आंदोलन

मा.खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार फंडातून करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २६ जानेवारीला बेमुदत ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी—आज२४तास–सोलापूर—माळशिरस तालुक्यामध्ये माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार फंडातून उभा करण्यात आलेल्या हायमास्ट दिवे या कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करून ठेकेदारावर काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करावी अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री वायचळ साहेब,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी श्री गुंडे साहेब व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र २ पि आर माने यांना निवेदन देऊन केली आहे.

सदर काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग माळशिरस या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे,माळशिरस तालुक्यातील खालील गावामध्ये अभिजित एजन्सी मार्फत झिजेवस्ती गावामध्ये ,अकलूजमध्ये प्रतापसिंह चौक,महर्षी कॉलनी,इंदिरा नगर,महावीर स्तंभ,पोलीस वसाहत,खंडाळी मागासवर्गीय वसाहत,मिरे गावामधील एसटी वसाहत,नेवरे येथील इनामदार व जालिंदर पाटील वस्ती,बागेचीवडी येथे वाघ वस्ती,दहिगाव येथे एस टी वसाहत,फोंडशीरास गावामध्ये शेंडे मळा, बाणलिंग विद्यालयासमोर,मांडवे गावामध्ये एस टी वसाहत,रेडे गावामध्ये एस टी वसाहत, गारवड गावामध्ये एस टी वसाहत,विझोरी गावामध्ये एस टी वसाहत,खंडाळी गावामध्ये,एस टी वसाहत,एस टी वसाहत वेळापूर गावामध्ये पालखी चौक,क्रांती चौक, एस टी वसाहत,म्हाळुंग गावामधील पायरी पूल येथील एस टी वसाहत,पिलीव गावामध्ये आंधळकर चौक, गारवड चौक येथील एस टी वसाहत,भांब गावामध्ये एस टी वसाहत,हनुमानवाडी गावामध्ये हुंबे वस्ती येथे,कारूंडे गावामध्ये श्रीराम मंदिर,नातेपुते गावामध्ये जठार वस्ती,कचरेवाडी गावामध्ये तुळजाभवानी मंदिर चौक,चाकोरे गावामध्ये प्रतापनगर,माळशिरस पंचायत समिती समोर,बागेचीवाडी येथे बोडके वस्ती,पिसेवाडी येथील बनकर वस्ती,बाभूळगाव येथे ग्रामपंचायत समोर,तांदुळवाडी येथे जि प शाळा न २,म्हाळुंग जिजामाता नगर,वाफेगाव येथे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ,चांदापुरी गावामध्ये,मेडद गावामध्ये, शेंडेचिंच येथे,खळवे,यशवंतनगर गावामध्ये बाजारतळ,एस टी वसाहत,महर्षी जिमखान्यासमोर,काटकर वस्ती मारुती मंदिराजवळ,पुरंदावंडे येथील पाझर तलाव येथे,खुडूस येथे एस सी वसाहत,मोठेवाडी येथे एस सी वसाहत,सुळेवाडी येथे एस सी वसाहत, सवतगव्हान येथे मारुती मंदिर,आनंदनगर येथील काटकर वस्ती,पठाणवस्ती गावांमध्ये,मारकडवाडी एस टी वसाहत, कुरबावी गावामध्ये एस टी वसाहत,बांगर्डे गावामध्ये एस टी वसाहत,माळीनगर येथे एस टी वसाहत,सवतगव्हान एस टी वसाहत, निमगाव येथे एसटी वसाहत येथे हायमास्ट दिवे उभारण्यात आलेले आहेत,

सदर हायमास्ट दिव्याच्या कामामध्ये इस्टीमेट/निविदेमध्ये असलेल्या गेज प्रमाणे पत्रा,असेल किंवा लोखंड हे वापरले आहे का ?त्याचप्रमाणे इतर मटेरियलची व या मध्ये वापरण्यात आलेल्या वायर,एल.ई. डी.बल्प, याची चौकशी करण्यात यावी,सदर कामामध्ये कमी गुणवत्तेचे मटेरियल वापरल्याची दाट शक्यता असून या कामामध्ये अनियमितता ही मोठया प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून हे माळशिरस तालुक्यामध्ये उभारण्यात आलेल्या हायमास्ट च्या कामामध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचप्रमाणे ज्या गावामध्ये हे हायमास्ट उभारले आहेत त्या ठिकाणी हे हायमास्ट अस्तित्वात आहेत का याचीही आपण चौकशी करून संबंधित प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या जबाबदार अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई न केल्यास जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयासमोर २६ जानेवारी २०२० पासून बेमुदत तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom