श्रीपूर येथे जांबूड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन

श्रीपूर येथे जांबूड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन

प्रदीप नाईकनवरे यांच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका

प्रतिनिधी : श्रीपूर : जांबूड येथील चंदनशिवे वस्ती येथील ग्रामीण मार्ग 448 रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी श्रीपूर येथे दलित महासंघाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या वेळी बांधकाम उपविभागाचे उपभियंता अशोकराव रणवरे व शाखा अभियंता भूमकर यांनी प्रदीप नाईकनवरे यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन सदरच्या रस्त्याचे काम हे कार्यारंभ आदेश होताच 15 दिवसात सदरचा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. सदरच्या लेखी पत्रास मान देऊन व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकाना वाहतुकीस अडथळा होऊन गैरसोय होऊ नये यासाठी दलित महासंघाचे तालुका प्रमुख प्रदीप नाईकनावरे यांनी सदरचे आंदोलन काही ठराविक कालावधीसाठी स्थगित केलेले आहे.

तसेच सदरच्या रस्त्याचे काम हे 15दिवसात पूर्ण न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदनही या वेळी उपभियंता यांना देण्यात आले. यावेळी जांबूड चंदनशिवेवास्तीवरील बाबासाहेब चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, व भिमराव चंदनशिवे आंदोलनात सहभागी होते तर श्रीरंग चंदनशिवे, सोनू नाईकनवरे, बाबासाहेब नागटिळक, सागर चंदनशिवे. हे पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित होते. तसेच अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या श्रीपूर औट पोष्टचे A. S. I. पानसरे साहेब व पोलीस नाईक गायकवाड साहेब हे सदर ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom