धवलसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची घौड दौड सुरू

धवलसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची घौड दौड सुरू

माळशिरस तालुक्यात काँग्रेसने उघडले खाते

प्रतिनिधी : म्हाळुंग : म्हाळुंग-श्रीपूर नगरपंचायत मध्ये काँग्रेसने खाते उघडले आहे,ही निवडणूक पहिल्यांदा होत असताना काँग्रेसचे अस्तित्व शून्य होते मात्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पद घेल्यामुळे काँग्रेस मध्ये आलेली मरगळ धूर झाली असल्याची परिस्थिती पाहायला मिळते आहे.जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर श्री मोहिते पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दौरा काढून पक्षामध्ये उर्जावस्था निर्माण केली आहे.त्यांच्या जिल्हाध्यक्ष होण्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे,धवलसिंह जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन आणतील असाच विश्वास व्यक्त करताना कार्यकर्ते दिसत आहेत.

माळशिरस तालुक्यातील पार पडलेल्या म्हाळुंग नगरपंचायत निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात काँग्रेस ने खाते उघडले असल्याने धवलसिंह हेच काँग्रेसला उभारी देवू शकतात अशीच अपेक्षा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत.

त्यामुळे धवलसिंह यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आपले अस्तित्व नक्कीच दाखवेल अशी चर्चा तालुक्यातील जनतेत चालू आहे. त्यामुळे धवलसिंह यांच्या नेतृत्वाखाली विजयाची घोडदौड सुरू झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशीच राजकीय विश्लेषक यांच्यामध्ये चर्चा रंगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom