पंढरपूरा तील दलालाने स्वतःचा आकडा वाढविण्याचा खटाटोप बंद करावा -आकाश माने

पंढरपूरातील दलालाने स्वतःचा आकडा वाढविण्याचा खटाटोप बंद करावा -आकाश माने

लवकरच राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या खोटेपणाचा बुरखा फाडणार !

प्रतिनिधी : पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेमध्ये सर्वांना बरोबर घेवून येणारी निवडणूक लढविण्याचा संकल्प एका पक्षाच्या राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने केला आहे,मात्र त्या नेत्याचे समाजासाठी व पंढरपूरकरासाठी कोणत्या प्रकारचे योगदान आहे.ह्या नेत्याचा धंदा दलाली करण्याचा आहे,हे संपूर्ण पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला सर्वसृत असल्याची घणाघाती टीका नूतन युवा सेनेचे उप जिल्हाप्रमुख आकाश माने यांनी केली आहे.

स्वतःचा इतिहास अगोदर तपासावा आणि आपली प्रतिमा काय आहे,आपल्याला सर्वसामान्य जनतेमध्ये काय म्हणून ओळख आहे,याची सर्वप्रथम शहानिशा करावी आणि मग पंढरपूर शहरातील विविध पक्षाला बरोबर घेवून सत्ताधारी यांचा बालेकिल्ला ढासळण्याची वल्गना करावी,या राज्य पातळीवर असलेल्या नेत्याची प्रतिमा,वाळू चोर,तसेच फसवणूक करणारा व वेळोवेळी मॅनेज होणारा नेता अशीच आहे त्यामुळे मला वाटत नाही की या राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या आवाहनाला कोणी भीक घालेल असेही माने यांनी आवर्जून सांगितले.

तसेच यांनी सर्वसामान्य जनतेला आंदोलनाला बोलवून त्यांची हजेरीसुद्धा दिलेली नाही आणि हे स्वतःला राज्याचे नेते समजणाऱ्या दलाल नेत्याने लक्षात ठेवले पाहिजे,

स्वतःने पंढरपूरमध्ये,दलाल,फसवणूक करणारा,की मॅनेज होणारा नेता या पैकी कोणती ओळख निर्माण केली आहे हे तपासावे,त्यामुळे राज्य पातळीवर दलाल नेत्याच्या पक्षाची भाजप बरोबर युती करण्याचे प्रयत्न चालू असताना हा नेता पंढरपूर शहरातील इतर पक्षातील नेत्यांनी स्वतःला बरोबर घ्यावे यासाठी खटाटोप करीत असल्याचे दिसून येत आहे आणि समजा नंतर भाजप बरोबर राज्य पातळीवर असलेल्या नेत्याची युती झाल्यास इतर पक्षातील नेत्यांना सांगून मला पक्षाचा आदेश मान्य करावा लागतोय हे उत्तर देवून सत्ताधारी पार्टीकडून स्वतःच आकडा मोठा करून त्यांच्याबरोबर निवडणूक लढविल्यास इतर पक्षातील नेते तोंडावर पडल्यास नवल वाटायला नको त्यामुळे अनेकांना फसवणाऱ्या ह्या राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या नादी न लागनेच इतर पक्षातील नेत्यांना फायदेशीर ठरेल,सर्व पक्षातील नेते माझ्याबरोबर आहेत असे दाखवून सत्ताधारी पार्टीकडून स्वतःचा आकडा वाढविण्यासाठी चाललेला हा खटाटोप असून दलाल नेत्याने हा खटाटोप बंद करावा असा इशारा देवून संबंधित स्वयंघोषित नेत्याचा खोटेपणाचा बुरखा फाडणार असल्याचेही आकाश माने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom