बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी अमोल घोडके यांची निवड
प्रतिनिधी : पंढरपूर : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून पंढरपूर येथील अमोल घोडके यांची बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब खंडाळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ उपस्थित होते.
बहुजन ब्रिगेड संघटनेचे विचार सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवून संघटनेची ध्येय धोरणे, तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करून संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांचा बहूजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा विचार सर्वत्र रुजविण्यासाठी व विद्यार्थी, महिला,शेतकरी,तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नूतन शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी सांगितले.
