अकलूजमधील हॉस्पिटलसमोरील रस्ते दुरुस्ती करा –किरण साठे
प्रतिनिधी : : अकलूजमधील हॉस्पिटलला जाणारे रस्ते दुरुस्ती करून ज्या हॉस्पिटलच्या समोर रस्ता अस्तित्वात नसेल तर नव्याने तयार करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन कार्यालयीन अधीक्षक सुनील काशीद यांनी स्वीकारले,यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष विकास बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे,महादेव ओव्हाळ उपस्थित होते.
अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीतील अस्तिवात असलेल्या हॉस्पिटलचा समोर असलेले रस्ते दुरुस्ती करणे ही फार मोठी गरज निर्माण झाली आहे.हॉस्पिटल समोरील रस्ते नादुरुस्त असल्याने सिरीयस असलेले पेशंट वेळेत न पोचल्याने अनेक पेशंट दगावले असल्याची उदाहरणे आहेत, तसेच गोरदर महिलांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने आपण अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीतील हॉस्पिटल समोर असलेले रस्ते तात्काळ दुरुस्ती करून ज्या ठिकाणी रस्ते अस्तित्वात नाहीत त्या ठिकाणी नव्याने रस्ते तयार करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. आणि तात्काळ मागणी मान्य न केल्यास अकलूजमधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक २४ जानेवारी २२ रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा साठे यांनी दिला आहे.
