खासदार सुप्रिया सुळे व सदानंद सुळे यांना कोरोनाची बाधा
पुणे पॅटर्न उपसंपादक तात्यासाहेब भाडळे
: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया ताई सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागन झाल्याची माहिती स्वतः खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी टिव्ट करत सोशल मिडियात दिली आहे. व आम्ही दोघेही व्यवस्थित असून काळजी करण्याचे कारण नाही असेही सांगितले आहे,
व आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली टेस्ट करून घ्यावी व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन देखील खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी केले आहे.
काही दिवसांपासून कोरोना चे रुग्ण वाढू लागले असून अनेक जण पोजेटिव्ह होताना दिसून येत आहे, राज्य सरकारचे नुकतेच अधिवेशन पार पडले,यात देखील दोन मंत्री कोरोना पोजेटिव्ह असल्याचे दिसून आले, एकंदरीत आता कोरोना ने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे, व त्यात ओमिक्राॅन विषाणू देखील मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे ठरणार आहे.
आपण पुर्वी प्रमाणे परिस्थिती न येण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असून जर कोरोना आटोक्यात आला नाही तर पुन्हा आपल्याला डाॅकडाऊन समोरे जावे लागेल.
त्यामुळे आपणच सगळे मिळून या गंभीर परिस्थितीवर मात करु शकतो, आपणच या सगळ्या गोष्टींची काळजी घेवू हाच एकमेव उपाय आहे.
