मैत्री प्रतिष्ठनच्या आक्रमक पवित्र्यामुळे अकलूज नगरपरिषद आली वठणीवर

मैत्री प्रतिष्ठनच्या आक्रमक पवित्र्यामुळे अकलूज नगरपरिषद आली वठणीवर

महेश शिंदे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

प्रतिनिधी : अकलूज :

13 ऑक्टोबर रोजी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेच्या समोर होणारे महाआरती आंदोलनास अकलूज नगरपरीषद चे मुख्याधिकारी जाधव साहेब यांच्या सकारात्मक चर्चेने व लेखी आश्वासनामुळे तात्पुरती स्थगिती दिले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.शिंदे यांनी अकलूज नगरपरिषदेवर कोणत्याही परिस्थितीत महा आरती आंदोलन करणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता,मैत्री प्रतिष्ठान च्या आक्रमक पवित्र्यापुढे नगरपरिषदेला त्यांच्या आंदोलनाची व मागण्यांची दखल घ्यावी लागली आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर नगरपरिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यामुळे महेश शिंदे यांनी अकलूजमधील विविध प्रकारच्या प्रश्नासाठी उठविलेला आवाज हा नगरपरिषदेच्या कानात घुमला आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद वठणीवर आली आहे.त्यामुळे महेश शिंदे यांचे अकलूजमधील जनतेतून कौतुक केले जाते आहे.

नगरपरिषदेच्या अधिपत्याखालील वेगवेगळ्या वार्डातील अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या मुलभूत लोक-हिताच्या प्रश्नांना घेऊन मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी वेळोवेळी नागरपरिषदेला वेगवेगळ्या वार्डातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पत्रव्यवहार करूनही झोपेचे सोंग घेतलेले नगरपरिषद यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केले होते.तदनंतर मा.महेश शिंदे यांनी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी नगरपरीषदे समोर अकलूज मधील प्रलंबित प्रश्नांना घेऊन महाआरती आंदोलन करण्या संदर्भात अकलूजचे मुख्याधिकारी मा.धर्याशिल जाधव साहेब यांना निवेदन दिले होते. त्या आंदोलनाच्या संदर्भातील निवेदनाची दखल घेऊन अकलूजचे मुख्याधिकारी मा. धर्याशिल जाधव साहेब मैत्री प्रतिष्ठान ला यांना भेटण्यासाठी अकलूज नगरपरीषद येथे बोलावले होते. या भेटीदरम्यान मा.मुख्याधिकारी जाधव साहेब यांनी सकारात्मक चर्चा करुन येत्या काही दिवसांमध्येच तुमच्या सर्व प्रलंबित मागण्या पुर्ण करू. आणि भविष्यात तुमच्या अकलूज मधील कोणत्याही मागण्या असतील तर मला आगोदर सांगा. त्या नक्कीच मी पूर्णं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. जेणेकरून तुम्हाला आंदोलन करण्याचे कष्ट होणार नाही. अशी सकारात्मक चर्चा करून लेखी आश्वासन दिले.लेखी पत्रानुसार 1)सफाई कामगार वारसा हक्क नुसार नियुक्ती करण्याबाबत लाड पागे कमिटी नुसार शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. 2)कोरोणामुळे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्काराची माफक दर प्राप्त होण्यास निविदा काढला जाईल. व रुग्णवाहिका अकलूजमध्ये जनतेसाठी माफक दरात (200)फक्त दिली जाणार आहे.3)अकलुज मधील कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी साठी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे. शासन निर्णय नुसार अतिक्रमण जागा निमित्त करून वाटप करण्यात येणार आहेत 4)अकलूज नगर परिषदेच्या अंतर्गत असणारे कोविडसेंटर हे राखीव बेड संदर्भात माहिती उपलब्ध होणार.5)अकलुज मधील कोरोना काळातील नियम व वेळ ही सर्व गाळेधारक नागरिकांना समान लागू केली आहे.6)नवीन बाजार तळावरील मंजूर असणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यात येणार आहे. व उर्वरित मच्छी मार्केट समोरील रस्ता तसेच गटारे व लोखंडी पाण्याची पाईप लाईन लवकरात लवकर मंजूर करून चालू करण्यात येईल.7)अकलुज मधील बंदिस्त असणाऱ्या गटारी दुरुस्त व स्वच्छ चालू केली आहे.8)कोरोना च्या काळात अनेक व्यवसाय व्यापार ठप्प असून शहरातील नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी गाळेधारकांचे भाडे माफ कायद्यात तरतूद नाही.परंतु त्यांना 31 डिसेंबर पर्यंत सवलत घेण्यात येत आहे.9)10/70 झोपडपट्टी येथील रस्ते गटारी अर्धवट काम चौकशी करून चालू करण्यात येणार आहे.10)नगर परिषदे मधील काही कर्मचारी पक्षवाद- श्रेयवाद आढळल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.असे लेखी आश्वासन दिले आहे.आंदोलन आधीच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विकासाचा विकास दादा धाइंजे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरणजी साठे साहेब,बहुजन मुक्ती पार्टी काकासाहेब जाधव,जनहित शेतकरी संघटनेचे किरण जी भांगे,लक्षवेधी सेनेचे अनिल जी साठे,प्रहार चे अविनाश भैया सोनावणे,अखिल भारतीय छावा संघटनेचे सुरेखा ताई वसव व विविध संघटना व पक्ष त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. या आंदोलनासाठी अजय मखरे,दुर्योधन गायकवाड, निता सुळे, पंकज वेदपाठक, सोहम बोडके, संजय वाघमोडे,शरद वाघमारे, व इतर मैत्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom