केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्राच्या हकालपट्टीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्राच्या हकालपट्टीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लखीमपूर खिरी येथील घटनेचा निषेध

प्रतिनिधी : अकलूज :

उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदन देवून उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरि येथील प्रकणारचा निषेध नोंदवला आहे.सदर निवेदन उपविभागीय अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी स्वीकारले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष खंडागळे,भीम शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश धाइंजे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे,रफिक मुलाणी,उपस्थित होते.

लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्य मंत्री असलेल्या अजय मिश्रा च्या मुलाने ठार मारल्याचा प्रकार घडला असून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रांची मुले शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे,त्यामुळे देशातील जनतेमध्ये व शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून या हुकूमशाही सरकारच्या मंत्रिमंडळातून या केंद्रीय राज्य मंत्री असलेल्या अजय मिश्राची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी साठे यांनी निवेदनात केली आहे. तसेच लखीमपूर खिरी येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे,त्याच बरोबर माळशिरस तालुक्यातील ज्या शेतकरी,सर्वसामान्य जनता,व्यापारी यांनी महाराष्ट्र बंदच्या अहवाणाला प्रतिसाद देत स्वतःच्या इच्छेनुसार सहभागी झाल्याबाबल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom