विभागीय आयुक्त यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आदेश
१५ दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना
विभागीय आयुक्त यांच्या आदेशाचे पालन न केल्यास मंत्रालयासमोर आंदोलनाचा साठेंचा इशारा
प्रतिनिधी : माळशिरस : सोलापूर जिल्ह्याच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह तत्कालीन माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्यावर कारवाई करून अकलूज सह इतर आठ गावातील बांधकाम परवान्याच्या चौकशी अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने किरण साठे यांनी बोंबाबोंब आंदोलन आयोजित केले होते,यावेळी समता परिषदेचे पिंटू एकतपुरे,आदित्य काकडे,सुरेश फाटे,विनोद कुमार,इत्यादी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना आंदोलनाच्या अनुषंगाने कळविले नुसार जिल्हा परिषद स्तरावरील कार्यवाही १५ दिवसाच्या आत पूर्ण करणेबाबत पुनश्च सूचित करण्यात येत असून याप्रकरणी दोषी असणारे अधिकारी /कर्मचारी यांचेवर नियमानुसार उचित स्तरावरून पुढील कारवाई प्रस्तावित करणेबाबत कळविण्यात आल्याचे लेखी पत्र पुणे विभागाचे आयुक्त डॉ सौरभ राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना दिले आहे.सोलापूर जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आस्थापना विभागाचे उपायुक्त यांच्या कार्यालयाकडून दोन वेळा आदेश देवून ही संबंधित प्रकरणावर मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ दिलीप स्वामी यांनी वेळकाढूपणा केला असल्यानेच स्वतः विभागीय आयुक्त डॉ सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.विभागीय आयुक्त यांच्या आदेशाचे पालन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ दिलीप स्वामी यांनी न केल्यास पुढचे आंदोलन हे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा साठे यांनी दिला आहे.

