मुख्याधिकारी यांना बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

अकलूजचे मुख्याधिकारी यांना बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

पुणे पॅटर्न प्रतिनिधी :

अकलूज : अकलूज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांना बहुजन ब्रिगेडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण साठे व बहुजन ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेच्या कामगार यांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.सदर निवेदन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी स्वीकारले.यावेळी बहुजन युवा ब्रिगेड संघटनेचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे व लक्षवेधी सेना जिल्हा अध्यक्ष धवल कांबळे उपस्थित होते.

नगर परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची शासनस्तरावरून नेमणूक करून त्यांच्या सर्व पगारी करण्यात याव्या व सध्या नेमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पद व विभाग त्याची प्रत मिळावी.सध्या कोणत्या विभागात कोणते कर्मचारी कार्यरत आहेत ते जनतेला व आम्हाला कळण्यासाठी त्याची प्रत आम्हाला मिळावी.तसेच या सर्व कर्मचाऱ्यांचा शासन स्तरावरून पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांच्या नेमणुका कराव्यात व थकलेला सर्व पगारी लवकरात लवकर कराव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने अकलूज युवा शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom