तत्कालीन मंगळवेढा प्रांताधिकारी भोसले यांच्या चौकशी साठी बहुजन ब्रिगेडचे २७ सप्टेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन

तत्कालीन मंगळवेढा प्रांताधिकारी भोसले यांच्या चौकशी साठी बहुजन ब्रिगेडचे २७ सप्टेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन

प्रतिनिधी : पुणे : पुणे विभागाचे आयुक्त यांना बहुजन ब्रिगेड संघटना यांच्या वतीने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रत्नागिरी ते नागपूर महामार्ग मध्ये गेलेल्या व संपादित केलेल्या जमिनी बाबतीत सखोल चौकशी करावी या मागणीसाठी दिनांक २७/९/२१ रोजी बोंबाबोंब आंदोलन आयोजित केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदन संस्थापक अध्यक्ष किरण साठे,प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिले आहे

नागपूर ते रत्नागिरी या महामार्गासाठी सांगोला तालुक्यातील जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नसल्याचे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी संघटनेकडे तोंडी आपले म्हणणे मांडले आहे,तसेच मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून २ ते ३ वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण मोबदला दिला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे,तसेच या जमीनी संपादित केल्यानंतर त्याचा मोबदला वाटप करण्यात येणाऱ्या प्रक्रियेत मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांनी मोठया प्रमाणावर घोटाळा केल्याची शक्यता निर्माण झाली आहे,तसेच मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांनी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांकडून खाजगी व्यक्तीमार्फत कमिशन घेतले असल्याची चर्चा सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारात जनतेमधून चालू असल्याचे पाहायला मिळाले आहे.तसेच काही शेतकऱ्यांना जमीन संपादित केल्यानंतर प्रत्येक्ष जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा २ ते ३ वर्षे झाली मोबदला दिला नाही, तसेच काही शेतकऱ्यांचे क्षेत्र संपूर्ण संपादित केले आहे मात्र त्या शेतकऱ्याला संपूर्ण क्षेत्राचा लाभ मिळाला नसून त्यांनाही तीन वर्षे झाली मोबदला दिला गेला नाही त्यामुळे या नागपूर ते रत्नागिरी या महामार्गासाठी सांगोला तालुक्यातील संपादित केलेल्या सर्व जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला का नाही ? याची चौकशी करण्यासाठी व मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांनी या सर्व प्रकरणात पैसे वाटप केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक्ष बोलावून चौकशी करण्यासाठी विभागीय स्तरावरून कमिटी नेमावी आणि या प्रकरणाचा उलगडा करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी,अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक २७/९/२१ रोजी संबंधित शेतकऱ्यांना घेऊन तीव्र स्वरूपात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल,तसेच आपण याची तात्काळ दखल न घेतल्यास आपल्या व मंगळवेढा प्रांत अधिकारी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालय मुंबई (ED) या कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात येवून त्यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा राजेश खरे यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रति सक्तवसुली संचालनालय (ED)कार्यालय मुंबई,महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom