अकलूज ते माळशिरस रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी व बहुजन चे आंदोलन
प्रतिनिधी: सोलापूर :महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ पुणे व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने किरण साठे यांनी निवेदन सादर करून अकलूज माळशिरस रस्त्यावर येत असलेल्या पाटील वस्ती येथील चढावर असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.सदर निवेदन गृह विभागाचे नायब तहसीलदार डी व्ही मोहोळे यांनी स्वीकारले.
आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या सातारा ते लातूर या महामार्गाच्या रस्त्यावर येत असलेल्या माळशिरस तालुक्यातील अकलूज ते माळशिरस या रस्त्यावरील पाटील वस्ती येथे असलेल्या चढावरून रस्त्या जात आहे तरी त्या रस्त्याची अतिशय बिकट अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे वाहनधारकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे,त्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत आणि अनेक अपघात झाले आहेत,संबंधित कामाचा ठेका घेतलेली कंपनी ही या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत असून तात्काळ हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा किंवा या रस्त्याला पर्यायी रस्ता निर्माण करून देण्यात यावा आणि इथून पुढे संबंधित रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार असलेल्या कंपनीवर ३०२ चा व अपघाताचे स्वरूप पाहून गुन्हा दाखल करण्याचा आदेश आपण द्यावा,तसेच संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची शक्यता असून संबंधित कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अकलूज ते माळशिरस रस्त्यावर पाटीलवस्ती येथील चढावर २० सप्टेंबर २०२१ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.
