नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी.
प्रतिनिधी—सोलापूर–कारंडेवाडी ता सांगोला येथील महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,यावेळी बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,भारत पाटील उपस्थित होते.सदर निवेदन निवासी कलेक्टर शमा पवार मॅडम यांनी स्वीकारले.
कारंडेवाडी ता.सांगोला येथील शेतजमीन गट ५८ मधील क्षेत्र हेक्टर१२आर तसेच गट नंबर ५९ मधील हेक्टर १४ आर हे क्षेत्र नागपूर- रत्नागिरी या महामार्गासाठी संपादित करून उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी डॉ भारत आप्पाराव पाटील यांचे क्षेत्र संपादित करून इतर लोकांशी संगनमत करून भारत पाटील यांना कोणत्याही प्रकारचा योग्य मोबदला दिला नसून त्यांची फसवणूक करून त्यांची संबंधित अधिकारी यांनी योग्य मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली असल्याने त्यांना नाहक त्रास देणाऱ्या सर्व जबाबदार अधिकारी यांच्या वर त्वरित कारवाई करुन त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित करुन योग ती चौकशी करण्यात यावी व संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी येत्या 13 स्पटेंबर २०२१ रोजी सागोंला तहसिल कार्यालया समोर संघटनेच्या माध्यमातून संबंधित डाॅ भारत आप्पाराव पाटील यांच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिला आहे
