अकलूज नगरपरिषद मध्ये नोकर भरती केवळ अफवा – मुख्य कार्यकारी अधिकारी
अकलूज नगरपरिषद मध्ये नोकर भरती केवळ अफवा – मुख्य कार्यकारी अधिकारी
अकलूज व माळेवाडी या ग्रामपंचायतीना महाविकास आघाडी सरकार ने हिरावा कंदील दाखवला आणि दोन्ही ग्रामपंचायतींची एकत्र अकलूज नगरपरिषद होण्यासाठी मार्ग मोकळा झाला अकलूज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक जवळ येत आहे तसे निवडणूकी चे वातावरण निर्माण झाले आहे सत्ताधारी यांच्या कडून नवनवीन युक्त्या वापरून अकलूज व माळेवाडी( अ) या परिसरातील सुशिक्षित(मतदारांना) बेरोजगारांना आकर्षित करण्यासाठी अकलूज नगरपरिषद मध्ये नोकरी च्या संदर्भात अफवा पसरवली जात आहे का ? याची चर्चा अकलूज नगरपरिषद परिसरातील गल्ली बोळात दबक्या आवाजात चालू आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, मंत्री इ सत्तेची सर्व सूत्रे सत्ताधारी मंडळी च्या हाती असताना सुध्दा MIDC तालुक्यात झाली नाही कि होऊ दिली नाही सुशिक्षित बेरोजगारांना देशोधडीला लावले सुशिक्षित बेरोजगारांनाची सत्ताधारी मंडळी कडून चेष्टा तर केली जात नाही ना? अशी चर्चा अकलूज मध्ये चालू आहे काही ठिकाणी अशा स्वरूपाची चर्चा आमच्या कानावर येताच लक्षवेधी सेना संस्थापक अध्यक्ष अनिल साठे व लक्षवेधी सेना प्रदेश अध्यक्ष अमित भिंगारदिवे तसेच लक्षवेधी सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवल कांबळे या पदाधिकाऱ्यांनी अकलूज नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रचंडराव साहेब यांची समक्ष भेट घेऊन अकलूज नगरपरिषद नोकर भरती प्रक्रिया संदर्भात चर्चा केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रचंडराव साहेब म्हणाले की कोणत्याही प्रकारची नोकर भरती सध्या सुरू नाही ही केवळ अफवा आहे , लक्षवेधी सेनेच्या वतीने अकलूज नगरपरिषद परिसरातील सुशिक्षित मतदारांना बेरोजगारांना आहवान आहे कि सत्ताधारी मंडळी कडून नोकरी चे गाजर दाखवून मत घेण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अकलूज नगरपरिषदेचे नोकरी भरती संदर्भात कोणतीही नोटीस काढण्यात आली नाही सर्व नोकरी भरती संदर्भात चर्चा ही केवळ अफवा असुन लोकांना आवाहन करण्यात येत आहे कि खोट्या फसव्या अफवा वरती विश्वास ठेऊ नका जागते रहो अफवा वरती विश्वास ठेऊ नका
