आत्मदहन करण्याचा रघूनाथ साठे यांचा इशारा

आत्मदहन करण्याचा रघूनाथ साठे यांचा इशारा

२१ खोल्या शाळेमाघील घरे काढण्याचे प्रकरण

प्रतिनिधी पुणे पॅटर्न

अकलूज :

माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मुली शाळा नंबर 3 च्या पाठीमागे असलेल्या दलितवस्तीमध्ये स्वतःचे घर असून सध्या अकलूज मध्ये सत्ताधारी असलेल्या लोकांकडून त्याठिकाणी असलेले वीस वर्षापासून ची लोकवस्ती उदवस्त करण्याचं काम चालू असून त्या लोकांना जागा देण्याचे आमिष दाखवून त्याची व्हिडिओ शूटिंग करून आमचं घर काढण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही अशा प्रकारचा पुरावा संबंधित सत्ताधाऱ्यांच्या लोकांकडून गोळा करण्यात येत असल्याची माहिती जनसेवा मागासवर्गीय आघाडीचे रघुनाथ साठे यांनी दिली आहे,

मात्र वीस ते पंचवीस वर्ष असलेले लोकवस्ती त्याच्यामध्ये साठे यांचे स्वतःचे घर असून सत्ताधारी पार्टीच्या लोकांकडून बळजबरी करण्याचा प्रयत्न चालू असून माझे घर काढण्याचा प्रयत्न केल्यास सत्ताधारी पार्टीच्या प्रमुख असलेल्या नेत्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बळजबरी केल्यास व माझ्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास किंवा माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास त्यांना सर्वस्व जबाबदार धरण्यात यावे तसेच घर काढण्यासाठी सत्ताधारी पार्टीच्या प्रमुख नेत्यांकडून व त्यांच्या कार्यकर्त्याकडून बळजबरी झाल्यास माझ्यासह कुटुंबातील सर्व व्यक्तींना घेऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा जनसेवा मागासवर्गीय आघाडीचे रघुनाथ साठे यांनी दिला आहे,तसेच लोकवस्तीमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या घराचे मालक रघुनाथ साठे यांनी कोणत्याही परिस्थितीत घर काढणार नसल्याचे सांगितले आहे.

21 खोल्या जिल्हा परिषद शाळा पाठीमागील सर्वसामान्य दलित समाजातील लोकांची वस्ती अस्तित्वात होती ती वस्ती काढून त्या संबंधित समाजातील लोकांना किती जागा दिली जाणार आहे,त्याची कोणतीही माहिती घरे काढण्यासाठी आलेले लोक देत नाहीत त्याच पद्धतीने नगर परिषद अकलुज कडून कोणत्याही प्रकारची अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले नसल्याची माहिती मिळाली आहे,मात्र जबाबदार नगरपरिषदेचे अधिकारी आम्हाला या अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही,अशी माहिती देताना दिसत आहेत त्यामुळे ज्या लोकांची घरे काढण्यात आले आहेत,त्या लोकांमध्ये जागा मिळते का नाही याची भीती निर्माण झाली आहे,

नवनाथ साठे
कार्यकर्ता जनसेवा संघटना
(खरा दयावान)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom