अकलूज नवीन बाजार तळावरील रस्त्यांच्या मुरमिकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात आले..
मैत्री प्रतिष्ठान च्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी : अकलूज : अकलूज नगरपरिषद च्या हद्दीतील नवीन बाजार तळ हा भाग असून अनेक दिवसा पासुन नवीन बाजार तळावरील मूलभूत प्रश्न मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे हे प्रशासनासमोर मांडत आहे. त्यानी अनेक आंदोलने करून प्रशासनासोबत पत्रव्यवहार तसेच विद्रोही स्वरूपात प्रशासनास जाब विचारला आहे.26 जुलै रोजी घेराव आंदोलन स्थगित करून अकलूज नगरपरिषद यांना तात्काळ वर्गीकरण करून आश्वासन आश्वासन तात्काळ पूर्ण झाले. परंतु नवीन बाजार तळावर रस्ता डांबरीकरण त्याच पद्धतीने गटार दुरुस्ती व पिण्याच्या पाण्याची लोखंडी पाइप लाईन झाली पाहिजे. असे महेश शिंदे म्हणाले, तसेच 59 लाख रुपये निधी मंजूर होऊन सुद्धा नवीन बाजार तळावरील मूलभूत प्रश्न त्यामध्ये घेतली नाही ही खंत सुद्धा व्यक्त केली. प्रशासनाने लवकरात लवकर उर्वरित काम पक्क्या स्वरूपाचे करून द्यावे अशी मागणी महेश शिंदे यांनी केली आहे.अन्यथा यानंतर शेवटचे विद्रोही स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा महेश शिंदे यांनी केला आहे.सदर काम तात्काळ करण्यात आल्याने मैत्री प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे नवीन बाजार तळ येथील जनतेमधून बोलले जावू लागले असून नवीन बाजार तळ परीसरातील जनतेतून महेश शिंदे यांचे कौतुक केले जाते आहे.
चौकट
जी आय पाईपलाईन, गटारी, पक्के रस्ते तसेच नवीन बाजार तळ येथील मूलभूत गरजा,समस्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी अकलूज नगरपरिषदकडे पाठपुरावा करणार असून नेहमीच मी या परिसरात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहणार असून सत्तेत असो अथवा नसो या परिसरात असलेल्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे काम कायम करणार आहे.
महेश शिंदे
संस्थापक अध्यक्ष-मैत्री प्रतिष्ठान
