मैत्री प्रतिष्ठानच्या झटक्याने गटविकास अधिकारी चार्ज..!!
अकलूज ग्रामपंचायतला दिले कार्यवाहीचे आदेश.
प्रतिनिधी: माळशिरस : मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी अकलूज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नवीन बाजार तळ येतील मूलभूत प्रश्न संदर्भात माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांना निवेदन देऊन घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता येत्या 26 जुलै रोजी मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने माळशिरस पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर घेराव घालून त्यांना नवीन बाजार तळ येथील मूलभूत प्रश्न सोडवले नाहीत याचा जाब विचारला जाणार होता त्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन गटविकास अधिकारी माळशिरस यांनी अकलूज ग्रामपंचायतीला एक परिपत्रक काढून नवीन बाजार तळावरील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले होते.
गटविकास अधिकाऱ्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने ग्राम विकास अधिकारी मुंगूसकर साहेब यांनी मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांना लेखी पत्र देऊन नवीन बाजार तळावरील जी आय पाईप लाईट करणे हे काम जलशक्ति मिशन अंतर्गत अकलूज ग्रामपंचायतीने प्रस्तावित केले असून उर्वरित पीव्हीसी पाईपलाईनचे काम हे पंचायत समिती सदस्य यांच्या 15 वा वित्त आयोग निधीतून प्रस्तावित केलेले आहे व नवीन बाजार तळ येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व गटर करणे हे काम दलित वस्ती सुधार योजना व इतर योजनेतून ग्रामपंचायत मंजुरीने प्रस्तावित करण्यात येईल अशा प्रकार चे लेखी पत्र देऊन माळशिरस येथील गटविकास अधिकारी यांना घेराव घालण्याचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असल्याने 26 जुलै रोजी चे
घेराव आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगून मैत्री प्रतिष्ठानच्या आंदोलनाच्या झटक्याने गटविकास अधिकारी चार्ज झाल्या असल्याचे मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी सांगितले.
अकलूज ग्रामपंचायत ने नवीन बाजारतळ येथील मच्छी मार्केट समोरील रस्ता व शंभर फुटी चौकीतील दुसऱ्या पट्ट्यातील रस्ता येथे तात्काळ मुरमीकरण करण्याचे आश्वासन दिले असून उर्वरित मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत पाठपुरावा केला जाणार असून हे आंदोलन रद्द न करता फक्त त्यांच्या आश्वासनानुसार स्थगित केले आहे.
महेश शिंदे
संस्थापक अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान

